आज तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण

कुंभारखनी येथे 4 रुग्ण, वांजरी येथे कोरोनाचा शिरकाव

0 13

जब्बार चीनी, वणी: आज शनिवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमधले 7 व्यक्ती आरटी-पीसीआर टेस्टनुसार तर 4 व्यक्ती रॅपिड ऍन्टिजन टेस्टनुसार पॉजिटिव्ह आले आहे. आज आलेल्या रुग्णांमुळे कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 621 झाली आहे. दरम्यान डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल प्रकरण शनिवारी रात्री मिटले. कोविड हॉस्पिटल विरोधात उपोषण करणा-या महिलांनी काही अटी व शर्तींवर उपोषण मागे घेतले. तीन दिवसांपासून तेली फैलातील महिलांचे उपोषण सुरू होते. या प्रकरणात प्रशासनाने मध्यस्थी केली होती.

आज यवतमाळहून 33 अहवाल प्राप्त झाले. यात 7 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 26 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. आज 27 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आले. तर अद्याप 62 अहवाल येणे बाकी आहे. सध्या तालुक्यात एकूण 621 पॉजिटिव्ह रुग्ण झालेत. यातील 492 व्यक्ती कोरोनावर मात करून रिकव्हर झाले आहेत. सध्या तालुक्यात 110 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे मृत्यूची संख्या 15 झाली आहे.

कुंभारखनीत 4 रुग्ण
आज आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील सेवानगर येथे 3 व विनायक नगर येथे 1 रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात कुंभारखनी येथे 4 भालर येथे 2, वांजरी येथे 1 रुग्ण आढळले आहेत.

आज 8 कोरोनामुक्त व्यक्तींना सुट्टी
आज कोरोना मुक्त झालेल्या 8 व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. सध्या तालुक्यात 110 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 60 व्यक्तींवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तर 59 रुग्ण होम आयसोलेट आहेत. यवतमाळ येथील जीएमसी येथे 22 व्यक्तींवर उपचार सुरू आहे. सध्या कोविड केअर सेन्टरमध्ये रुग्ण आणि संशयीत असे 60 व्यक्ती भरती आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.