कायर येथे महिलेचा विनयभंग

कायर शेतशिवारातील घटना, तक्रार दाखल

0 12

जब्बार चीनी, वणी: कायर येथील एका महिलेवर परिसरातील शेतशिवारात एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली. शुक्रवारी दिनांक 25 सप्टेबर रोजी दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

शुक्रवारी दुपारी कायर येथील शेतशिवारात एक 32 वर्षीय महिला शेतीचे काम करत होती. याच गावात आरोपी जीवन मंगेश गुरणुले (42) राहतो. दुपारी 3 वाजताच्या दरम्यान जीवनला पीडित महिला शेतात काम करत असताना आढळली.  त्याची महिलेवर नजर पडली व त्याने महिलेचा विनयभंग केला.

याबाबत पीडित महिलेने शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी जीवन गुरणुलेवर भादंवि कलम 354 नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला रात्रीच अटक केली. घटनेचा तपास ठाणेदार अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर धावडे करीत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.