जुना पांढरकवडा नाक्याजवळ आढळला मृतदेह

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

0 10

तालुका प्रतिनिधी, वणी: रविवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी वणी यवतमाळ रोड वरील पांढरकवडा रोडवर एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाची ओळख पटली असून सदर तरुण शहरातील दामले फैल परिसरातील असल्यीची माहिती आहे.

रविवारी जुना पांढरकवडा नाका येथे सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास काही नागरिकांना एक तरुण पडून दिसला. सुरुवातीला त्यांना तो दारू पिऊन असल्याचे वाटते. मात्र कोणतीही हालचाल न झाल्याने त्यांनी तिथे जाऊन पाहिले असता सदर तरुण मृत अवस्थेत असल्याचे आढळून आले.

सदर तरुणाचे नाव मनोज चक्रवर्ती करदवार असे असून तो दामले फैल येथील रहिवाशी आहे. तो हमालीचे काम करायचा. तो घरी देखील क्वचित जायचा व बाहेरच राहायचा अशी माहिती मिळाली आहे. त्याचा मृत्यू कशाने झाला हे अद्याप कळू शकले नाही.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.