ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

वणी यवतमाळ रस्त्यावरील घटना

0 12

तालुका प्रतिनिधी, वणी: समोर जात असलेल्या दुचाकीला कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला. सदर घटना दि. 16 बुधवारला रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान वणी यवतमाळ मार्गावरील पळसोनी बसथांब्यालगतच्या मातामंदिराजवळ घडली. राजकुमार अंबर मेश्राम (55) असे मृतकाचे नाव आहे.

परसोडा येथील रहिवासी राजकुमार मेश्राम हे वणीवरून मोपेड दुचाकी (क्रं. MH34 BG 0082 )ने परसोडा येथे रात्री जात होते. दरम्यान पळसोनी बसथांब्याजवळ वणी वरून यवतमाळच्या दिशेला जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला मागच्या बाजूने धडक मारली. गंभीर जखमी झाल्याने मेश्राम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. वणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध भांदवीच्या कलम ( 279, 304 अ ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.