अखेर अमितचा मृतदेह घुगूस येथे सापडला

पाटाळा पुलावरून उडी घेऊन केली होती आत्महत्या

0 14

विवेक तोटेवार, वणी: शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी बल्लारशाह येथील रहिवासी असलेल्या युवकाने पाटाळा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी दुपारी त्याचा मुतदेह हा घुग्गुस येथील नदीपात्रात आढळून आला. शिरपूर पोलिसांनी पंचनामा करून वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनसाठी हा मृतदेह पाठविला आहे.

शुक्रवारी 11 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास अमित विठोबाजी पोले (29) या तरुणाने पाटाळा नदीच्या पुलावर आपली दुचाकी क्रमांक MH34 BN 7513 उभी करून नदीत उडी घेतली. एका इसमास ही दुचाकी ओळखीची वाटल्याने त्याने सदर माहिती ही अमितचे वडील विठोबाजी जे जनता महाविद्यालयात शिक्षक होते त्यांना दिली. माहितीवरून अमितच्या काही मित्रांनी शुक्रवारी रात्री उशिरा 11 वाजता घुग्गुस पोलिसात अमित बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

शनिवारी 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक मृतदेह हा घुग्गुस येथे नदीपात्रात आढळून आला. याबाबत अमितच्या निकटवर्तीयांनी शिरपूर पोलिसांना माहिती दिली. शिरपूर पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करून सदर मृतदेह हा अमितचा असल्याचे स्पष्ट केले. शिरपूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.