स्माईल फाउंडेशनने केले सरकारी हॉस्पिटलमध्ये वृक्षारोपण

कडुलिंब, गुलमोहरासह लावलीत विविध झाडे

0 14

विवेक तोटेवार, वणी: स्माईल फाउंडेशनने सरकारी हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण केले. त्यात कडुलिंब, गुलमोहर आणि पिंपळाचा समावेश होता. यावेळी सरकारी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. सुलभेवार, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक सागर जाधव, विनम्र कुईटे, आकाश लेडांगे, गणेश गोहोकार, निखिल मुत्तलवार, कपिल राऊत, सचिन जाधव इत्यादी सदस्य उपस्थित होते.

सर्व झाडांना ट्री गार्डची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्माईल फाउंडेशन ही एक एन.जी.ओ. आहे. शिक्षण, आरोग्य व पर्यावरण इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करीत असते. वर्षभर या फाउंडेशनचे विविध उपक्रम सुरूच असतात. प्रयोगशील आणि उपक्रमशील संस्था म्हणून या फाउंडेशचा लौकिक आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.