बाबापूर येथे शेतकऱ्याची आत्महत्या

शंकरच्या आत्महत्येने चिमुकले झाले पोरके

0 11

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील बाबापूर (कायर) येथील शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली. शंकर गुलाब काकडे (32) असे मृतकाचे नाव आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बाबापूर येथील शेतकरी शंकर काकडे यांनी शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास घरची मंडळी झोपेत असताना कीटकनाशक प्राशन केले. सदर प्रकार घरच्या मंडळीच्या उशिरा लक्षात आला.
उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मृतकाच्या नावे जमीन नाही. मात्र त्याच्या कुटुंबाकडे सात एकर शेती आहे. शंकर हा एकत्र कुटूंबातील शेतीत राबत होता. मृतकाच्या मागे पत्नी सविता, समीर आणि अथर्व दोन मुले आहेत. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

वणीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून बाबापूर येथे दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शंकरच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस जमादार विजय मोडक पुढील तपास करीत आहेत.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.