अबबं.. लोकप्रतिनिधींच्या आप्तांनीच केले रस्त्यावर अतिक्रमण…

रहिवाशांचा आरोप, अतिक्रमण हटवण्याची मागणी...

0 14

विवेक तोटेवार, वणी: राजूर कॉलरी येथील वार्ड क्र. ३ मध्ये राहणारे सुधाकर भगत यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. ते सार्वजनिक रस्त्यावर आल्याने वार्डातील नागरिकांनी ते अतिक्रमण करून केले जात असल्याचा आरोप करीत तक्रार केली आहे. या बांधकामावर आक्षेप घेऊन ते अतिक्रमित बांधकाम हटविण्याची मागणी एका निवेदनातून केली आहे. त्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून करण्यात आलेले बांधकाम बंद न झाल्यास नियमित येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या रस्ता बंद होऊन गैरसोय निर्माण होईल. जनतेला दैनंदिन कामांसाठी नाहक त्रास सहन करावा लागेल. करिता ताबडतोब हे अतिक्रमण हटवून जनतेला होणारी गैरसोय टाळावी. अशी विनंतीवजा मागणी उपविभागीय अधिकारी, राजूर ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सचिवांकडे केली आहे. पदाधिकारीच यामध्ये गोवले गेले असल्याने कधी व कशी कार्यवाही होते, याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.

निवेदनावर ज्ञानेश्वर तेलंग, संजय पाटील,अजय भुसारी, नदीम शेख,असित तेलंग, वसंत पाटील,पंजाब भगत, हरिभाऊ अंबादे, देवेंद्र गजभिये,राकेश चिमुरकर,कुंदन भगत, युगंधर गजभिये,सागर नगराळे,मो. नूर शेख, विक्की यादव, अक्षय खोब्रागडे आदी लोकांच्या सह्या आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.