वृत्तपत्र एजंट रमेश अक्केवार यांचे निधन

रविवारी सकाळी होणार अंत्यविधी

0 13

सुशील ओझा, झरी: मुकुटबनचे वृत्तपत्र एजंट रमेश गणपत अक्केवार (65) यांचे आज शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्यावर रविवारी सकाळी मुकुटबन येथे अंतीम संस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंड असा आप्त परिवार आहे.

रमेश अक्केवार हे मुकुटबन येथील एक वृत्तपत्र एजंट होते. विविध पेपरच्या डिस्ट्रिब्युशनची जबाबदारी त्यांनी योग्यरित्या निभावली. यासह त्यांनी पत्रकारीता देखील केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.