गोपालपूर येथील तरुणाची विष पिऊन आत्महत्या

सकाळी शेतात आढळून आला मृतदेह

0 13

जब्बार चीनी, वणी: गोपालपूर (खांदला) येथील एका तरुणाने विष पिऊन आत्महत्या केली. आज शनिवारी दिनांक 5 सप्टेंबर रोजी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्या स्पष्ट झाले नसून घटनेची नोंद शिरपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राहुल अशोक सातपुते (27) हा गोपालपूर (खांदला) येथील रहिवाशी आहे. शुक्रवारी रात्री राहूल घरून निघून गेला. मात्र रात्री तो परत आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी आज सकाळी त्याचा शोध घेतला.

दरम्यान परिसरातीलच एका शेतात राहुल मृत अवस्थेत आढलून आला. त्याच्या कुटुंबीयांनी याची माहिती शिरपूर पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत सदर घटनेचा पंचनामा केला व उत्तरिय तपासणीसाठी बॉडी ग्रामीण रुग्णालयात पाठवली.

राहुलने विष पिऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.