300 रुपयांचे पेट्रोल भरा, टु व्हिलरची फ्रि वॉशिंग करा

वणीतील लाठीवाला पेट्रोल पंप येथे बाईकसाठी लकी ड्रॉ स्किम

0 9

जब्बार चीनी, वणी: टुव्हिलरच्या ग्राहकांना 300 रुपयांचे पेट्रोल भरल्यावर गाडीची फ्री वॉशिंग मोफत मिळणार आहे.* कोर्टासमोरील लाठीवाला पेट्रोल पंप येथे ही भन्नाट स्किम सुरू झाली आहे. कोरोनाचा काळ सध्या काटकसरीचा आहे. पेट्रोल भरणे आवश्यक आहे. वॉशिंगे वगैरे गोष्टी आपण टाळतो. जर तुम्ही लकी असाल आणि ड्रॉमध्ये तुमचा नंबर लागला, तर तुमच्या गाडीची फ्रि वॉशिंग होईल. पंपावर गेल्यावर तुम्हाला याचे डिटेल्स मिळतीलच.

कोरोना काळात आपण हात आणि शरीर स्वच्छ ठेवतो. त्यातच पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे गाडी लवकर घाण होते. या स्कीममध्ये नंबर लागल्यास, आता गाडीही स्वच्छ ठेवता येईल. गाडीचं काम आपल्याला रोजच आणि दिवसभर असतं. त्यामुळे 300 रूपये किंवा जास्तीचं पेट्रोल टाकलं तर ते उपयोगातच येणार आहे. त्यातही 300 रूपये किंवा त्यावर पेट्रोल टाकलं तर योजनेचा लाभही मिळू शकतो. त्यामुळे ही स्किम ग्राहकांसाठी पूर्ण लाभदायी आहे.

काय आहे ही स्किम…
ही स्किम अगदी सोपी आहे. यात तुम्हाला तुमच्या बाईक, टुव्हिलरमध्ये 300 रुपयांचे पेट्रोल भरायचे आहे. पेट्रोल भरल्यावर तुम्हाला एक लकी ड्रॉ कुपन देण्यात येईल. रोज संध्याकाळी लकी ड्रॉ काढण्यात येईल. यात जे भाग्यशाली विजेत असणार त्यांची बाईक सर्विस सेन्टरमध्ये फ्री मध्ये वॉशिंग करून दिली जाईल.

काय आहेत नियम व अटी?

  • ही स्किम केवळ वणीतील लाठीवाला पेट्रोल पंपासाठीच आहे.
  • केवळ 300 किंवा त्यापेक्षा अधिकचे पेट्रोल भरल्यावरच लकी ड्रॉ कुपन मिळेल
  • ही स्किम केवळ टु व्हिलर साठी आहे.
  • रोज संध्याकाळी लक्की ड्रॉ काढला जाईल.
  • केवळ भाग्यशाली विजेत्यांनाच फ्रि बाईक वॉशिंगची सुविधा मिळेल.

स्वच्छेतेबाबात संपूर्ण काळजी घेतो आम्ही – लाठीवाला ब्रदर्स
सध्या कोरोनाच्या काळामुळे योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आम्ही सर्व योग्य ती खबरदारी घेतो. दर काही तासांनंतर आम्ही पेट्रोलपंप सॅनिटाईज केले जाते. पेट्रोल पंपवर प्रत्येक कर्मचारी मास्क घातलेला असतो. शिवाय ग्राहकांसाठी सॅनिटायजरची व्यवस्था केलेली आहे. ग्राहकांच्या काळजीसोबतच आम्हाला ग्राहकांच्या गाडीचीही काळजी आहे. त्यामुळे ग्राहक आणि त्यांची गाडी दोन्हीही स्वच्छ राहण्यासाठी आम्ही 300 रुपयांच्या पेट्रोलवर फ्रि टुव्हीलर वॉशिंगची स्किम लॉन्च केली आहे.
– संचालक, लाठीवाला ब्रदर्स

वणी शहरातील लाठीवाला ब्रदर पेट्रोल पंप हे ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेले एक सुप्रसिद्ध पेट्रोल पंप आहे. अधिक माहितीसाठी व स्किमचा लाभ घेण्यासाठी एकदा लाठीवाला ब्रदर पेट्रोल पंप येथे भेट द्यावी अशी विनंती लाठीवाला पेट्रोल पंपाच्या संचालकांनी केली आहे.

*नियम व अटी लागू

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.