जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात झरी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून शेतकऱ्यांचे कौतुक

0 18

सुशील ओझा, झरी: जिल्हा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व जिल्हा कृषि विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने बचतभवन, जिल्हा अधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. पालकमंत्री तथा महसूल मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला.

झरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शेतकरी यांनीसुद्धा या ठिकाणी भाजीचे स्टॉल लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झरी तालुका कृषिमित्र नीलेश भोयर यांनी रानभाजीबद्दल माहिती व त्यांचे महत्त्व सांगितले. पालकमंत्री यांनी झरीच्या स्टॉलवर भेट दिली. स्टॉलवर सर्व प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होत्या. यावेळी पालकमंत्री यांनी शेतकरी बांधवांचे कौतुक केले.

या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, आत्मा प्रकल्प संचालक, कृषी विज्ञान केंद्राचे अधिकारी, सर्व तालुका कृषिविभागाचे अधिकारी, सर्व कृषि मित्र, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर तिवारी, सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.