चिखलगांव येथील आरोग्यकेंद्रामध्ये निवासी डॉक्टरांची नेमणूक करा

वणी तालुका युवा कॉंग्रेस कमिटीची मागणी

0 12

विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव येथील आरोग्यकेंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी एका डॉक्टरची नेमणुक करण्यात आली होती. त्या डॉक्टर ने काही कारणास्तव येथून आपली बदली करुन घेतली. त्यामुळे इथे लवकरच निवासी डॉक्टरची व्यवस्था करा. ही मागणी वणी तालुका युवा कॉंग्रेस कमिटीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली.

आज सर्व जग कोरोना-19 या महामारीने ग्रासलेले आहे. या आरोग्य केंद्रावरती डॉक्टर
नसणे ही शोकांतिका आहे. गावात आरोग्यकेंद्र असतानासुध्दा येथील गोरगरीब जनतेला उपचाराकरिता
खासगी रुग्णालयात जावे लागते. तसेच गरोदर महिलांना प्रसुतीकरिता डॉक्टर नसल्यामुळे अन्य रुग्णालयात
जावे लागते.

तेथील उपचाराचा आर्थिक भुंदंड न परवडणारा आहे. गावातील आरोग्यकेंद्र फक्त शोभेची वास्तू
आहे का? असी गावकऱ्यांची ओरड आहे. या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन या आरोग्यकेंद्रावरती
निवासी डॉक्टरच्या नेमणुकीबाबत संबंधित विभागाशी चर्चा करावी. या ठीकाणी निवासी डॉक्टरची नेमणुक करावी असे निवेदन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे. निवेदवावर अशोक नागभिडकर आणि प्रदीप खेकारे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.