मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणाला अज्ञात वाहनाची धडक

मांगरुळ येथील तरुणाचा मृत्यू, मारेगावात सकाळी अपघात...

0 10

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील पेट्रोल पंप जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 6.30 वाजता दरम्यान घडली. मृतक मांगरुळ येथील रहिवाशी आहे. ऐन गणेश चतुर्थी, महालक्ष्मी उत्सवात ही दुर्दैवी घटना घडल्याने मांगरुळ येथे शोककळा पसरली आहे.

राकेश मोहन ढुमने (30) रा. मांगरुळ हा रोज सकाळी मांगरूळ ते मारेगाव रोडवर पायदळ फिरायला यायचा. आज सकाळी पेट्रोल पम्पजवळ राकेशला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. अपघातात राकेशच्या डोक्याला मागच्या बाजुने गंभीर दुखापत झाली. त्यात तो जागीच ठार झाला.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राकेशच्या पश्चात त्याचे वृद्ध आई वडील, पत्नी मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे.

दोन वर्षांपूर्वी भावाचाही अपघातात मृत्यू
दोन वर्षां पूर्वी राकेशचा मोठा भाऊ रितेश ढुमणे याचा सुद्धा गौराळा जवळ अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर आता राकेशला अपघातात जीव गमवावा लागला आहे. एकाच कुटुंबात सलग आलेल्या दोन्ही अपघाती मृत्यू मुळे ढुमणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.