दशरथ बुर्रेवार यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

महसूलदिनी झाला त्यांचा गौरव

0 15

सुशील ओझा, झरी: महसूलदिनानिमित्त पांढरकवडा उपविभागीय स्तरावरील व यवतमाळ जिल्हा स्तरावरील उत्कृष्ट पोलीस पाटील पुरस्काराचे वितरण झाले. टाकळीचे दशरथ भाऊरावजी बुर्रेवार यांना हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार तालुका दंडाधिकारी खिरेकार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार गोल्हर आणि मत्ते उपस्थित होते.

बुर्रेवार यांनी गावपातळीवरील प्रशासकीय जबाबदाऱ्या उत्कृष्टरीत्या पूर्ण केल्यात. गावातील अवैध दारूविक्रीला प्रतिबंध लावला. तंटामुक्त अभियान ते यशस्वी राबवीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना अन्नधान्य वाटप आणि जनजागृती करीत आहेत. ते सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.