अकोला येथील शासकीय आयटीआय (मुलींची) प्रवेशाला मुदतवाढ

विविध ट्रे़डमध्ये मुलींची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑगस्ट पर्यंत

0 14

सुनील इंदुवामन ठाकरे, अकोला: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) अकोलाच्या ऑगस्ट 2020 सत्रासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झाला. प्रवेश अर्ज ऑनलाईन करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे. केवळ महिलांकरिता राखीव असलेली हे जिल्ह्यातील एकमेव शासकीय आैद्याेगिक प्रशिक्षण संस्था संस्था आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांतील महिला, मुली या संस्थेत प्रवेश घेऊ शकतात. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. काैशल्यपूर्ण प्रशिक्षण प्राप्त करून रोजगार तसेच स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आयटीआयच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत.

तरी इच्छुकांनी http//admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज सादर करावा, असे आवाहन प्राचार्य राम मुळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थेतील समुपदेशन केंद्राला सकाळी १० ते ११ या वेळेत भेट द्यावी अशी माहिती संस्थेचे शिल्पनिदेशक अरविंद पोहरकर यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
आयटीआय मुलींची अकाेला संस्थेत विविध अभियांत्रिकी तथा गैरअभियांत्रिकी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.