डोलोमाईट कंपनीतील कर्मचाऱ्यांना केली शिवीगाळ, पोलीस स्टेशनला तक्रार

अडेगाव येथील स्थानिकांना कंपनीत नोकरी देण्याची युवकांची मागणी

0 10

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील अडेगाव येथे जगती माईनिंग डोलोमाईट कंपनीतील कर्मचाऱ्यांना अडेगाव येथील २५ ते ३० तरुणांनी अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याची तक्रार मुकुटबन पोलीस स्टेशनला देण्यात आली. जगती डोलोमाईट कंपनीत गावातील युवकांना नोकरीवर घ्या अशी तरुणांची मागणी होती.

गावातील २५ ते ३० तरुण युवक कंपनीतील कार्यालयाजवळ जाऊन कंपनीतील कर्मचारी गौरव गोयलसह इतर कर्मचाऱ्यांसोबत बोललेत. गावातील युवकांना नोकरीवर घेण्याकरिता आग्रह केला. कंपनीचे कर्मचारी गौरव गोयल यांनी सध्या कोणत्याही जागा उपलब्ध नाही. ती झाल्यास कळवितो असे सांगितले.

तसेच ५० टक्के कर्मचारी हे अडेगावतीलच असून इतर लोकल ठिकाणचे आहे असेसुद्धा सांगितले. परंतु युवक ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. आमच्या गावातील तरुणांना तुम्ही नोकरीवर घ्याच असा हट्ट धरून बसले . विविध आरोप करीत युवकांनी गोयल व त्यांच्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ केली व धमकी दिली.अशी तक्रार पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.