वरोरा रोडवरील बारसमोर राडा

डोक्यावर बॉटल फोडल्याने एक जखमी

0 12

विवेक तोटेवार, वणी: वणीतील वरोरा रोडवरील एका बारसमोर राडा झाला. त्यात एका व्यक्तीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडण्यात आली. मंगळवारी रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत जखमीच्या वडिलांद्वारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, मोहन दिलिप मुळे (31) हा जैन ले आउट येथील रहिवाशी आहे. मंगळवारी संध्याकाळी तो त्याच्या काही मित्रांसोबत वरोरा रोडवरील एका बारमध्ये गेला होता. दरम्यान तिथे आरोपी बादशाह उर्फ नंदकिशोर रासेकर (36) हा आला. तिथे मोहन व बादशहा यांच्यामध्ये वाद झाला. त्यातून त्यांनी एकमेकांना शिविगाळ केली.

दरम्यान वाद वाढून बादशहा याने मोहनच्या डोक्यावर दारूची बॉटल फोडली. त्यात मोहन गंभीर जखमी झाला. तर दरम्यान झालेल्या हातापायीत मोहनचा मित्र सौरभ हनुमंते हा किरकोर जखमी झाला आहे. दरम्यान वाद सोडवण्यासाठी राकेश नामक व्यक्ती आला असता त्याला देखील धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.

सध्या जखमीवर उपचार सूरू असून या प्रकरणी जखमी मोहनचे वडील दिलीप महादेवराव मुळे यांच्या फिर्यादी वरून आरोपी बादशाह ऊर्फ नंदकिशोर रासेकर याच्या विरुद्ध भादंविच्या कलम 326 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.