ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा उत्साहात

कायर येथील प्रयास इंग्लीश मीडियम स्कूलचा उपक्रम

0 16

विवेक तोटेवार, वणी: कायर येथील प्रयास इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ऑनलाईन देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा झाली. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हा उपक्रम झाला. विद्यार्थ्यांनी गीतगायन स्पर्धा व देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा यांत भाग घेतला. संस्थेच्या अध्यक्षा सुनीता जितेंद्र काळे आणि संस्थेचे सचिव जितेंद्र नामदेव काळे यांच्या मार्गर्शनाखाली विविध उपक्रम यानिमित्ताने राबविण्यात आलेत.

यावेळी ८० विद्यार्थ्यांनी गीतगायन तर 50 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला. शाळेचे उपमुख्याध्यापक शिवशंकर नांदे, अतुल पंधरे आणि गुणरत्न आवारी हे देशभक्ती गीतगायन स्पर्धेचे परीक्षक होते. तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षक दीपक कोवे, बळवंत जुमनाके आणि शेखर मत्ते होते. ही ऑनलाईन स्पर्धा यशस्वी
करण्यासाठी सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.