आधी टेस्ट निगेटिव्ह, नंतर पॉजिटिव्ह… आज मृत्यू….

वणीतील तरुणाचा कोरोनामुळे नागपूरमध्ये मृत्यू

0 17

जब्बार चीनी, वणी: मंगलम पार्क येथील एका 20 वर्षीय तरुणाचा कोरोनाने नागपूर येथे मृत्यू झाला. त्याच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता. त्याची आधीची टेस्ट निगेटिव्ह होती. मात्र शनिवारी त्या तरुणाची एका खासगी रुग्णालयात रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली असता रिपोर्ट पॉजिटिव्ह आला व आज सकाळी त्या तरुणाचा मृत्यू झाला.

वणीतील मुकुटबन रोडवरील मंगलम पार्क येथील एक 20 वर्षीय तरुण आजारी असल्याने त्याला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र रुग्ण गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याच्या पालकांना त्याला नागपूर येथे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. 25 जुलै रोजी त्या तरुणाला नागपूर येथील (जीएमसी) शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

नियमानुसार आजारी असलेल्या रुग्णाना भरती करण्याआधी कोविड टेस्ट केली जाते. त्यानुसार त्याची शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्ट करण्यासाठी नेले. तिथे त्याची टेस्ट निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी डॉक्टरांनी त्याची रॅपिड ऍन्टिजन टेस्ट केली असता ती पॉजिटिव्ह आली. त्यानंतर दोनच दिवसाने सकाळी त्याचा मृत्यू झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.