वणीत जुगार अड्यावर पोलिसांची धाड

10 जुगाऱ्यांना अटक, साडे तीन लाखांची रोख रक्कम जप्त

0 3,540

विवेक तोटेवार, वणी: 8 जुलैच्या मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शास्त्रीनगर भागात पोलिसांनी एका जुगार अड्यावर धाड टाकली. यात 10 जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये नगदी जप्त केले आहे. सदर कारवाई एसडीपीओ पथकाने केली.

काल रात्री खब-यामार्फत उपविभागीय पोलीस अधिकारी यांना शास्त्रीनगर येथे आरिफ रहेमान खलील रहेमान (42) याच्या घरी जुगार सुरू असल्याची टीप मिळाली. माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी आपल्या पथकाला रवाना केले. रात्री 1 वाजताच्या सुमारास पथकाने आरिफ याच्या घरावर धाड टाकली. यावेळी घऱाच्या मागच्या खोलीत 10 जण जुगार खेळत असताना त्यांना आढळून आले.

प्रातिनिधिक फोटो

यात घरमालक आरिफ रहेमान खलील रहेमान (42), शरफोद्दीन शाह नन्ना शाह (52) रामपूरा वार्ड राजुरा, विनोद कवडुजी जीवतोडे (37) चिखलगाव, गब्बार खां मोते खां पठाण (40) रा. यवतमाळ, नंदू रामराव खापणे (27) कोलगाव, अनिल ज्ञानदत्त मिश्रा (32) शास्त्रीनगर घुग्गुस, हिरासिंग दरबार सिंग अकाली (52) रा. समुद्रपूर, जगदीश गुरुचरण पाटील (37) राजूर कॉलरी, जहिर रियाज शेख (32) रा. घोन्सा यांचा समावेश आहे. यांच्याकडून नगदी 3 लाख 31 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले. यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4, 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली विजय वानखेडे, इकबाल शेख, आशिष टेकाडे, रवी इसनकर, अशोक दरेकर यांनी केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.