राजगृहावरील भ्याड हल्ल्याचा वणीत तीव्र निषेध

आरोपींना तात्काळ अटक करण्याची वंचित आघाडीची मागणी

0 2,114

जब्बार चीनी, वणी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काल रात्री काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. वणीतही या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवेदन देऊन करण्यात आली आहे.

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरूंनी राजगृहात प्रवेश केला. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक केली. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. हा केवळ राजगृहावर नाही तर आंबेडकरी अस्मितेवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली.

निवेदन देते वेळी मंगल तेलंग, भारत कुमरे, गौतम जिवणे, प्रशिल तामगाडगे, रविंद्र कांबळे, प्रलय तेलतुंबडे, विशाल कांबळे, उल्हास पेटकर, कंदन नगराळे, किशोर मुन यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.