वणीत वनमंत्री संजय राठोड यांचा वाढदिवस साजरा

शिवसैनिकांतर्फे आरसेनिक एल्बम औषधाचे वाटप

0 1,045

विवेक तोटेवार, वणी: महाराष्ट् राज्याचे वनमंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा 30 जून मंगळवारी वाढदिवस होता. यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे वणी शहर प्रमुख राजु तूराणकर यांचे पुढाकाराने व उपजिल्हा प्रमुख दिपक कोकास यांच्या मार्गदर्शनात 600 बॉटल आरसोनिक एल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आणि नेते मंडळींनी त्यांचा वाढदिवस साजरा करू नये असे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या केवळ सामाजिक उपक्रम राबवून नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्यात येत आहे. मंगळवारी संजय राठोड यांच्या वाढदिवसाला शिवसैनिकांनी संपूर्ण वणी शहरात फिरून आरोग्य अहवाल तयार करणारे आशा सेविका, अर्जनविस, शिव भोजन सेन्टर, पत्रकार बांधव, सलून व्यवसायीक यांना अरसेनिक अल्बम या रोगप्रतिकार शक्ती वाढवणा-या गोळ्यांचे वाटप केले.

प्रगती नगर, गणेश गृहनिर्माण सोसायटी या परीसरातही घरोघरी जावून आरसोनिक एल्बम 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राजु तुराणकर, माजी युवासेना शहरप्रमुख ललित लांजेवार , शहर संघटक महेश पहापळे, अजिंक्य शेंडे, जनार्दन थेटे, मंगल भोंगळे, सचिन ठावरी, निखिल तुराणकर, दिवाकर नागतुरे, जनार्दन थेटे, रिता पहापळे, संगिता तुराणकर, शारदा पहापळे, बाचिकवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.