गिट्टीच्या ढिगा-यावर सापडले मृत अर्भक

चिखलगाव येथील सदाशीव नगरमधील घटना

0 5,247

जब्बार चीनी, वणी: अवघे जग कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. चिखलगाव हद्दीतील सदाशीव नगर इथे एका गिट्टीच्या ढिगा-यावर एका अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. सध्या याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे.

सकाळी सदाशीव नगर येथे गिट्टीच्या ढिगा-यावर एक मृत अर्भक पडून असल्याचं एका ड्रायव्हरला दिसले. ड्रायव्हरने ही बाब ताबडतोड त्यांचे मालक अतुल हिवरकर यांना सांगितली. अतुल हिवरकर यांनी घरासमोर एक नवजात अर्भक सापडल्याची माहिती चिखलगावचे उपसरपंच अमोल रांगणकर यांना कळवली. नगरसेवक धीरज पातेने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली.

या अर्भकास जिन्स पॅन्टच्या बाहीत गुंडाळून ठेवण्यात आले होते. हे अर्भक मुलीची असल्याची माहिती मिळाली असून ते 4 ते 6 महिन्याचे असल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहे. याविषयी पोलीस स्टेशऩ पुढील प्रक्रिया करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.