मारेगाव येथे लोकाअदाकत संपन्न

तालुका सेवा विधी समिती व नगरपंचायतीचा पुढाकार

0 401

ज्योतिबा पोटे, मारेगाव: तालुका सेवा विधी समिती आणि नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने 17 ऑगस्ट गुरुवारी सकाळी 10 वाजता नगरपंचायत प्रांगणात लोकादालत कार्यक्रम झाला. प्रमुख वकिलाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी न्यायाधीश अॅड. बोधनकर होते, तर कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी नगराध्यक्षा इंदु किन्हेकर ह्या होत्या.

या कायदेविषयक शिबिरात वकिलानी उपस्थितांना मार्गदर्शन केले. महिलांवर होणारे अत्याचार, शेती शिवारातील पांदनरस्ते, हुंडा संबधित होणारे गुन्हे, घरगुती हिंसा यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक ऍड पुनवटकर यांनी केले, संचालन अॅड परवेज पठाण यांनी तर आभार नगरसेविका जिजाताई वरारकर यांनी मानले.

या शिबिराचा नगरसेवक, नगरसेविका, गावातील नागरिक यांनी लाभ घेतला. या शिबिरात शहरातील वकील अॅड हुसेनी, अॅड भास्कर ढवस, अॅड नितिन जुनगरी, अॅड प्रफुल भोयर, अॅड पावडे इत्यादी नामांकित वकिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.