एकमेकांवर कुऱ्हाड, सबलीने वार…. एक जखमी

चोपण येथे वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन हल्ला

0 1,769

वणी बहुगुणी डेस्क: मारेगाव तालुक्यातील चोपण येथे शेताचे वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊन एकमेकावर कुऱ्हाड सबळीने हल्ला केल्याची घटना गुरुवारी 18 जूनला संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान घडली. या प्रकरणी एक जण जखमी आहे. दोन्ही गटातील व्यक्तींनी मारेगाव पोलीस ठाण्यात परस्पर तक्रार केली असून पोलिसांनी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या तक्रारीनुसार फिर्यादी सुनील दादाजी घागी (39) रा. चोपण यांनी आरोपी अजय नारायण आसुटकर (35) यांना तू शेतातून बैलबंडी घेऊन का गेला? असे म्हणत अजय सोबत वाद घातला. त्यावरून वाद वाढल्याने अजयने सुनीलवर कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला. यात सुनील घागी जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी अजय नारायण आसुटकर व राजू नारायण आसुटकर (37) रा. चोपण यांचेवर भादंविच्या कलम 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सांकेतिक फोटो

दुसऱ्या गटातील फिर्यादी सीमा अजय आसुटकर (29) रा. चोपण यांच्या तक्रारीनुसार आरोपी सुनील घागी याने हातवारे करत इशारे केले. त्यामुळे सीमाचे पती अजय आसूटकर व आरोपी सुनील यांच्यात वाद झाला. यात सुनीलने अजयवर सबल व विळ्याने जीवघेणा हल्ला करत हाणामारी केली. याप्रकरणी सुनील दादाजी घागी (39), संदीप दादाजी घागी (34), प्रमीला सुनील घागी (32), रूपा संदीप घागी (29) रा. चोपण यांचेवर भादंविच्या कलम 324, 504, 506, 509, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या या प्रकरणी दोन्ही गटातील फिर्यादींच्या तक्रारीची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात जमादार टोंगे करित आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.