चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार शिरली शेतात

अपघातात दोन जखमी, मांगरुळ शिवारातील घटना

0 414

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगावहून वणी कडे जात असताना कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. कार कोलांट्या खात थेट शेतात शिरली. या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. बुधवाररी संध्याकाळच्या सुमारास मांगरुळ शिवारात ही घटना घडली.

संध्याकाळच्या सुमारास दोन तरुण मारुती सुझुकी या कारने (एम एच 34 के 4947) मारेगावहून वरोरा कडे जात होते. दरम्यान मांगरुळजवळ कारचालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने कार महामार्ग वरून थेट शेताचे कंपाउंड तोडून कोलंडया खात शेतात शिरली. त्यामध्ये सचिन मनोहर वाढई वय 28 रा. वरोरा तसेच ऋषिकेश खंगार रा. वरोरा हे दोन्ही तरुण गंभीर झाले.

अपघाताची वार्ता कळताच परिसरातील नागरिकांनी त्या दोन तरुणांना प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखले केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना वणी येथील खासगी रुग्णलयात भर्ती करण्यात आले. दोघांचीही प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.