विजेच्या धक्याने शेतक-याचा मृत्यू

कपडे वाळू घालण्याच्या तारेवर करंट आल्याने मृत्यू

0 1,461

विवेक तोटेवार, वणी: सोमवारी 1 जून रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास बोपापूर येथे एका शेतकऱ्याला विजेचा धक्का लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी आलेल्या वादळी वा-यामुळे त्यांच्या घरावरील वायर कटला होता त्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

विलास मधुकर मिलमिले (48) हे बोपापुर तालुका झरी येथे राहून शेती करीत होते. रविवारी सायंकाळी वादळी वा-यासह पाऊस झाला. यावेळी त्यांच्या घरातील एक विद्युत वायर कटला होता. ज्यातून विद्युत प्रवाह कपडे वाळू घालण्याच्या तारामध्ये आला. सकाळी विलास हे स्नान करून तारेवर टॉवेल वाळविण्याकरिता गेले. त्यावेळी अचानक त्यांचे विजेचा धक्का बसला व ते जागीच खाली पडले.

घरातील कर्ता पुरूष गेला…
सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्यांना वणीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी विलासला मृत घोषित केले. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या मागे आई, एक मुलगा व मुलगी असा आप्तपरिारी होता. त्या सर्वांची जबाबदारी विलासवरच होती. कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.