गाव सिल करण्यावरून हाणामारी, एक जखमी

कोरोनात गावात वेगळाच राडा, एकावर कुऱ्हाडीने हल्ला

0 2,838

सुशील ओझा, झरी: कोरोनामुळे गाव सिल करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दोन गटात झालेल्या या हाणामारीत एक युवक जखमी झाला आहे. ही घटना पाचपोहर येथील आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा भीतीमुळे तसेच बाहेरील कोणताही नवीन अनोळखी व्यक्ती पाचपोहर गावात येऊ नये याकरिता गावातील ईश्वर टेकाम 35, पोतु आत्राम दादाराव टेकाम व पाच ते सहा गावातील इसम हे गावात येणाऱ्या रस्त्यावर डेरी व फाटे गाडून रस्ता बंद करीत होते. त्यावेळी आरोपी आनंदराव कुमरे (40) विलास आत्राम (35) बाबुराव कुमरे सर्व रा. पाचपोहर हे तिथे येऊन तुम्ही जाण्या येण्याचा रस्ता का बंद करता अशी विचारणा केली. त्यांनी गाडलेले डेरी व फाटे उपडून फेकून दिले व ते अंगावर धावून गेले.

त्यामुळे या दोन्ही गटात धक्काबुक्की झाली. वादामध्ये आनंदराव कुमरे यांच्या हातातील कुराड फिर्यादी ईश्वर टेकाम यांच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला लागून कपाळावर जखम झाली. तसेच इतर आनंदराव यांच्या दोन्ही सोबतीने हातात काठ्या घेऊन रस्ता बंद करून तुमचे मुरदे पडतो अशी धमकी दिली व अश्लील शिवीगाळ केली व तिथून निघून गेले.

जखमी ईश्वर याने पाटण पोलीस स्टेशनला तक्रार दिली यावरून पोलिसांनी वरील आरोपी विरुद्ध कलम 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार अमोल बारापात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश पिदूरकर करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.