भीमनाळा तलाव शिवारातील हातभट्टीवर पोलिसांची धाड

10 लिटर मोहदारू जप्त, आरोपीला अटक

0 492

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीमनाळा येथे गावठी मोहाची हातभट्टी वर ठाणेदार व कर्मचारी यांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे.

भीमनाळा तलाव शिवारात हातभट्टीवर दारू काढण्यात येत असल्याची गुप्त माहिती पाटणचे ठाणेदार अमोल बारापात्रे यांना मिळली. त्यावरून चालक हेमंत कामतवार, होमगार्ड मोहमद इरफान मो युसूफ व राजू गुडेवार यांना घेऊन ते भीमनाला घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी आरोपी बाजीराव मोरे वय ६५ वर्ष रा राजनी याला अटक करून त्याच्याजवळील 10 लीटर दारू नष्ट करण्यात आली. तसेच भट्टीजवळील मोहफुलही नष्ट करण्यात आले.

पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार रमेश पिदूरकर करीत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे दारू बंद असल्याने तळीरामांनी आपला मोर्चा हातभट्टीकडे वळवला आहे. सध्या मोहफुलाचा सीजन असल्याने मोहाची दारू काढण्याचे प्रकारही वाढले आहेत. तळीरामही बाईकने येऊन पाच लिटरच्या कॅनमध्ये दारू भरून नेत असल्याची माहिती आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.