एका गुन्ह्यासाठी अटक, उलगडली दुसरी घटनाही

दोन चोरट्यांना पोलिसांनी केले गजाआड

0 1,307

विवेक तोटेवार, वणी: जवळपास 2 आठवड्यापुर्वी एक किराणा दुकान फोडणारे व दोन दिवसांपूर्वी घरातून मोबाईल चोरणाऱ्या दोन चोरट्यास वणी पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईल चोरीच्या घटनेत आरोपींना ताब्यात घेतले असताना  याच आरोपींनी किराना दुकान फोडल्याचे समोर आले.

मोहमद इमरान मोहमद असिफ यांनी त्यांच्या घरातून 14 एप्रिलच्या रात्री दरम्यान दोन मोबाईल चोरी गेल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 279 नुसार गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी 16 एप्रिल रोजी वणी पोलिसांना पेट्रोलिंग करीत असताना या चोरट्यांबाबत खबर मिळाली.

पोलिसांनी राजू पुरुषोत्तम पोटे (35) रा. नवीन लालगुडा व प्रफुल्ल परशुराम शंभरकर (47) रा. खडबडा यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन्ही मोबाईल जप्त केले. यांना अधिक विचारपूस केली असता दोन तीन आठवड्यापुर्वी गोकुळ नगर येथे किराणा दुकानात चोरी केल्याची कबुलीही या आरोपीनी दिली.

त्यांच्याकडून 4370 रुपयांचा किराणा माल जप्त करण्यात आला. या दोघांकडून एकूण 14370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी पथकाने केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.