सात वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

नायगाव येथे घडली माणूसकीला काळीमा फासणारी घटना

0 4,196

सुनील पाटील, वणी: शिरपुर पोलीस स्टेशन हददीतील नायगांव (बुद्रुक) येथे वास्तव्यास असलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका 39 वर्षीय नराधमाने लैगिंक अत्याचार केल्याची घटना दि. 18 मार्च ला दुपारी 12 वाजता घडली. तक्रारीअंती शिरपूर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपीचे नांव कवडू दौलत बोबडे असे असून तो गवंडी काम करतो.

आरोपी कवडू बोबडे (39) हा घटनेच्या दिवशी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बालिकेच्या घरा लगतच मिस्त्री काम करीत होता. शाळेला सुट्टी असल्यामुळे इयत्ता दुसरीत शिकणारी बालिका घरी एकटीच होती तर तिचे आई वडील कामा निमित्त बाहेर गेले होते. संधीच्या शोधात असलेल्या नराधमाने पाणी पिण्याचा बहाणा करीत बालिकेला पाणी मागीतले तिने पाणी आणून देताच तीला उचलून लगतच असलेल्या स्नानगृहात नेले आणि लैगिंक अत्याचार केला. यानंतर आरोपीने काही वेळातच पळ काढला.
घडलेल्या या भयावह प्रकाराने बालिका प्रचंड घाबरली. सायंकाळी आई वडील घरी परतताच तिने ओटीपोटा जवळ दुखत असल्याचे सांगितले. तिला तातडीने घुग्गूस येथील डॉक्टरांना दाखविले असता चंद्रपुर ला तपासणी करीता घेवुन जाण्यास सांगीतले.

चंद्रपुर येथील डॉक्टरांनी त्या पीडित बालिकेची तपासणी केल्या नंतर बालिके सोबत विपरीत घडल्याचे निदर्शनास आले. तातडीने या प्रकरणी शिरपूर पोलिसांना सूचना देण्यात आल्या. तर बालिकेला विश्वासात घेवून विचारणा केली असता तिने घडलेल्या प्रकारा बाबत संपूर्ण माहिती सांगितली.

शिरपुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन पोउनि ढवळे, जमादार सुगत दिवेकर, योगेश ढाले, प्रमोद जुनूनकर, संजय खांडेकर, अनिल सुरपाम यांच्या पथकांसह नायगांव गाठले व आरोपीला बेडया ठोकल्या. याप्रकरणी आरोपींवर बाल लैगिंक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.