‘कोरोना’बाबत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन

एसडीओ व मुख्याधिका-यांच्या निलंबनाची मागणी

0 1,009

विवेक तोटेवार,वणी: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून वणी नगर परिषदेने रंगनाथ स्वामी यात्रा बंड करण्याचा निर्णय घेतला. परंतु याच जत्रा मैदानात बैलबाजार मात्र अद्यापही आहे. हे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन असून त्याबाबत उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.

सध्या कोरोनाबाबत राज्य शासनाने कठोर पावलं उचलली आहेत. त्याच अनुशंगाने 14 मार्च रोजी यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला आहे. वणी नगर पालिकेने रंगनाथ स्वामींची यात्रा तर रद्द केली मात्र या यात्रेनिमित्त सुरू राहणारा बैलबाजारावर मात्र कोणतीही कार्यवाही केली नाही. याव्यतिरिक्त मारेगाव तालुक्यात बोरी येथील यात्रा घेण्यात आली.

उपविभागीय अधिकारी आणि मुख्याधिकारी हे कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेत नसल्याचा आरोप करत त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.