बेवारस दुचाकी पोलिसांनी केली जप्त

दोन दिवसांपासून होती झुडुपांत पडून

0 645

पंकज डुकरे, कुंभा: येथील बसथांब्यापासून काही अंतरावरील रोडच्या बाजूला झुडपं आहेत. तिथे दोन दिवसांपासून बेवारस दुचाकी पडून होती. ती दुचाकी सोमवारी मारेगाव पोलिसांनी जप्त केली.

कुंभा-मारेगाव रोडच्या लगत झुडपामध्ये MH34 BC 1028 क्रमांकाची अज्ञात दुचाकी शनिवारच्या रात्रीपासून बेवारस पडून होती. दोन दिवसांपासून ती त्याच अवस्थेत पडून असल्यामुळे काही सुजाण नागरिकांनी ह्याची माहिती मारेगाव पोलिसांना दिली. पाेलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून बेवारस दुचाकी जप्त केली. सदर दुचाकी चोरीची असावी अशी शंका उपस्थित केली जात आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.