विष प्राशन करून इसमाची आत्महत्या

0 522

पंकज डुकरे, कुंभा: मारेगाव तालुक्यातील शिंदी येथील एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी २७ रोजी सायंकाळी ७:३० वाजता घडली. सुधाकर मारोती देवाळकर वय ५२ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. मृतकाने घरी कोणीच नसल्याची संधी साधत विषारी औषध प्राशन केले. घरच्या मंडळींच्या लक्षात येताच त्याला तात्काळ मारेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला.

सुधाकर यांच्या नावे संयुक्त ३ हेक्टर ४२ आर शेती होती. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळु शकले नाही. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा आप्त परिवार आहे. त्याच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.