दहेगाव येथील युवकाचा विषप्राशनाने मृत्यू

कुंभा परिसरातील दुर्दैवी घटना

0 825

पंकज डुकरे, कुंभा: नजिकच्या दहेगाव(कुंभा) येथील पंचवीस वर्षीय युवकाने रविवारी विषारी औषध घेतले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल केशव चटकी (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे.

रविवारी सदर युवकाने कुंभा गावालगतच्या बेंबळा कालव्यावर विषारी औषध प्राशन केल्याचे कळले. कुटुंबियांना याची माहिती मिळताच त्याला तात्काळ उमरी येथील दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला यवतमाळ येथे हलविले. त्याने विष का घेतले याचे कारण कळू शकले नाही. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.