‘सिमेंट सिटी’ ते ‘ऑरेंज सिटी’ थेट धावणार बस

गडचांदूर - वणी - नागपूर प्रवासाचा मार्ग

0 615

विलास ताजने, वणी: सिमेंट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथून ऑरेंज सिटी अर्थातच नागपूर बससेवेला नुकताच प्रारंभ झाला. राजुरा बस आगारकडून सदर बससेवा सुरू करण्यात आली आहे. गडचांदूर, कोरपना येथील ग्रामस्थांनी सदर बस सुरू करण्याबाबत राजुरा बस आगार व्यवस्थापकांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. सदर बस गडचांदूर येथून दररोज सकाळी ७:३० वाजता सुटणार आहे. कोरपना, वणी, वरोरा मार्गे ही बस धावणार आहे. त्याच मार्गाने परतीचा प्रवास होणार आहे.

या बससेवेचा लाभ गडचांदूर, कोरपना, जिवती, आदीलाबाद तसेच वणी परिसरातील विद्यार्थी, व्यापारी आणि नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. परिसरातील ग्रामस्थांनी राजुरा आगार व्यवस्थापकांचे आभार मानले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.