आज सायंकाळी नगर वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन

नवीन ग्रंथांचे प्रेक्षणीय प्रदर्शन बघण्याची वणीकरांना संधी

0 231

 

बहुगुणी डेस्क, वणी : येथील नगर वाचनालयात रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन ग्रंथांचे प्रेक्षणीय प्रदर्शन आयोजित केले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन निवृत्त न्यायाधीश विजय देशमुख करणार असून अध्यक्षस्थानी शि.प्र.मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला असणार आहेत.

प्रदर्शनाचे आयोजन स्व. अण्णाजी देशमुख व स्व. भाऊराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन सायं सात वाजता व्हावयाचे आहे. ग्रंथप्रेमींनी ग्रंथप्रदर्शनाला उपस्थित राहून ग्रंथदर्शनाचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती वाचनालयाचे अध्यक्ष माधव सरपटवार व सचिव गजानन कासावार यांनी केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.