गुणवंत विद्यार्थ्यांचा केला लोकप्रतिनिधींनी सत्कार

विठ्ठलवाडीच्या गुरुदेव मंडळाचा स्तुत्य उपक्रम

0 310

विलास ताजने, वणी : येथील विठ्ठलवाडी परिसरातील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने गुणवंत विध्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. गजानन अळगते होते. विशेष अतिथी म्हणून आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, पंचायत समिती उपसभापती संजय पिंपळशेंडे उपस्थित होते.

याप्रसंगी तालुक्यातील इयत्ता दहावी, बारावीत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मंचावरील उपस्थितांनी मनोगत व्यक्त करीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला शिक्षक पेचे, मांडवकर, भगत, वैजनाथ खडसे, नगरसेवक राजू भोंगळे, दहेकर, शेट्टे यांच्यासह सर्व गुरुदेव सेवक उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे क्षेत्र आता विस्तृत झाले आहे. त्यांच्या संधींच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यांनी निरंतर ज्ञानार्जन करून अपडेट राहावं, असं यावेळी मान्यवरांनी म्हटलं.

कार्यक्रमाचे संचालन दिलीप डाखरे, प्रास्तविक प्रमोद राजूरकर यांनी केले. मारोतराव ठेंगणे यांनी आभार मानले. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व गुरुदेव सेवकांनी सहकार्य केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.