मुकूटबन येथील पोलीस उपनिरीक्षक चुलपार यांना निरोप

0 332

सुशील ओझा, झरी: मुकूटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार यांची बदली यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे झाली. त्यानिमित्त बुधवारी पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदार धर्मराज सोनुने यांच्या अध्यक्षतेखाली शाल श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.

उपनिरीक्षक चुलपार हे गेल्या दोन वर्षांपासून मुकूटबन पोलीस स्टेशनला कार्यरत होते. दोन वर्षात त्यांनी चांगले कार्य करून अनेक तपास पूर्णत्वास आणले कायद्याच्या चाकोरीत राहून एक मोठी जवाबदारी त्यांनी पार पडल्याचे ठाणेदार सोनुने यांनी व्यक्त केले. तर एएसआय सुरपाम व प्रवीण ताडकोकुलवार यांनी चुलपार यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्याजवळून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमात ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढच्या वाटचाली च्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप कवरासे यांनी केले. आभार प्रदर्शन सुलभ उईके यांनी मानले. त्यावेळी पत्रकार सुशील ओझा, हिरापूरचे पोलीस पाटील काटकर, पोलीस स्टेशनचे एएसआय दर्शनवार, जमादार मारोती टोंगे, मोहन कुडमेथे, सुलभ उईके, प्रदीप कवरासे, नीरज पातूरकर, रमेश मस्के, संदीप बोरकर आणि महिला शिपाई देविका मेश्राम,अनुराधा वासाडे व योगिता चटकी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.