वणीचे अशोक वासेकर यांचे अपघातात निधन

आमला गावाजवळ गाडीला अपघात, तीन जखमी

0 1,720

बहुगुणी डेस्क, वणी: राळेगाव मार्गे कळंबच्या दिशेने जाताना वणीतील व्यावसायिक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालय अशोक वासेकर (55) यांचे आमला गावाजवळ झालेल्या कार अपघातात निधन झाले. यात त्यांच्या पत्नी कल्पना वासेकर (50) या देखील गंभीर जखमी आहेत. यांच्यासह आणखी तीन जण जखमी आहेत. त्यांच्यावर सध्या यवतमाळ येथे उपचार सुरू आहे.

अशोक वासेकर हे शनिवारी दुपारी राळेगाव मार्गे त्यांच्या कुटुंबासह कारने (एम एच 29-ए आर 3961) कळंबला जात होते. दरम्यान आमला गावाजवळ चालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटले व त्यांच्या गाडीने एका झाडाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी गंभीर होती की त्यात कारचा चुराडा झाला. जखमींना तात्काळ कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने जखमींना यवतमाळ येथे हलवण्यात आले.

यवतमाळ येथे उपचारादरम्यान अशोक वासेकर यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहे. अशोक वासेकर यांच्या मृत्यूची बातमी वणीत कळताच वणीत एकच शोककळा पसरली. सोशल मीडियावरून लोकांनी शोकसंवेदना व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. आज रविवारी सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे.

संजय देरकर यांनी व्यक्त केली शोकसंवेदना
अशोक वासेकर यांच्या रुपाने आम्ही एक साथी गमावलाय. अत्यंत मनमिळावू आणि लोकांच्या कार्यासाठी तत्पर असणा-या व्यक्तींचा मृत्यू मनाला चटका लावून गेला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी असून त्यांच्या कुटुंबांना या दुखःद प्रसंगातून लवकरात लवकर सावरायचे बळ मिळो, अशी शोकसंवेदना त्यांनी सोशल मीडियातून व्यक्त केली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.