‘त्या’ अपघातातील जखमी कृष्णाजी पिदूरकर यांचा मृत्यू

नागपूर मार्गावर झाला होता अपघात

0 1,405
विलास ताजने, वणी: वणी येथून रुग्ण घेऊन नागपूरला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसून अपघात झाल्याची घटना दि. ९ जुलै मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या दरम्यान जामच्या पुढे घडली होती. या घटनेत वडिलांसह दोन मुले जखमी झाले होते. पैकी वडील कृष्णाजी पिदूरकर यांचे गुरूवारला निधन झाले.
वणी येथील सेवानिवृत्त शिक्षक कृष्णाजी पिदूरकर हे घरी पडल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी रुग्णवाहिका क्र. एम. एच. ३१ सी. बी. ३१०४ ने उपचारासाठी नागपूरला जात होते. जामच्या पुढे वाहकाचे नियंत्रण सुटून रुग्णवाहिकेची रस्त्याच्या कडेला नादुरुस्त ट्रक क्र. ए.पी. ३९ डब्लू २१६७ ला मागच्या बाजूला जबर धडक बसली होती.
यात रुग्ण कृष्णाजी पिदूरकर, नरेश पिदूरकर, महेश पिदूरकर जखमी झाले होते. सर्व जखमींना पोलिसांनी सेवाग्रामच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. अखेर कृष्णाजी पिदूरकर यांचे निधन झाले. तर मुलगा नरेश रुग्णालयात दाखल आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.