तरुणांचा नंगी तलवार घेऊन धुमाकुळ

चिखलगाव परिसरातून तीन तरुणांना अटक

0 2,130
विवेक तोटेवार, वणी: गुरुपौर्णिमा उत्सव सर्व लोक साजरा करीत असताना चिखलगाव रेल्वे क्रॉसिंगजवळ बाईकवर हातात नंगी तलवार घेऊन धुमाकुळ घालणा-या तीन तरुणास अटक करण्यात आली. त्यांच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी गुरुपौर्णिमा असल्याने वणीकर उत्सवात दंग होते. दरम्यान संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास पंकज वामन राव (21) राहणार साधनकरवाडी वणी, सय्यद जावेद मकदर अली (35) राहणार वणी, सोनू दिगंबर मुंदलकर (24) राहणार अमरावती हल्ली मुक्काम वणी हे तरुण पल्सर बाईकवर (MH34-AF 2648) बसून हातात नंगी तलवार घेऊन चिखलगाव परिसरात फिरत होते. फिरताना ते लोकांना धाक जमवत होते.
याच वेळी पेट्रोलिंगसाठी निघालेल्या डीबी पथकातील सुधीर पांडे, सुनील खंडागळे व अमोल यांनी त्यांना बघितले व त्यांना थांबवले. त्यांच्या हातातील तलवार ताब्यात घेतली व त्यांना पोलीस वाहनात बसवून ठाण्यात आणले. ठाणेदार वैभव जाधव यांच्या आदेशानुसार या तीनही तरुणांवर 4/25 शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.