शिंदोल्यात सेनेच्या कामगार संघटनेच्या शाखा फलकाचे अनावरण
कामगारांच्या समस्या दूर करण्याचे आश्वासन
विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला येथे दि.७ रविवारला शिवसेनेच्या भारतीय कामगार संघटनेची स्थापन करण्यात आली. यावेळी शाखा फलकाचे अनावरण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दीपक कोकास यांच्या हस्ते करण्यात आले. सह उदघाटक म्हणून उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, यवतमाळ कामगार सेना अध्यक्ष अविनाश भुजबळराव उपस्थित होते.
