संजय देरकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

आगामी निवडणुकीच्या संदर्भात चर्चा

0 1,143

विवेक तोटेवार, वणी: आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. त्यादृष्टीने सर्वच उमेदवार आता प्रचाराच्या कामाला लागले आहे. आज मंगळवारी दिनांक 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संजय देरकर यांच्या घरी कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभेबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीत कार्यकर्त्यांना संजय देरकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच कार्यकर्त्यांनीही विविध विषयांवर चर्चा केली. आगामी विधासभा निवडणूक लढण्याचा निश्चय करण्यात आला असून आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागा असा आदेश संजय देरकर यांनी यावेळी दिला. या चर्चेला मोठ्या संख्येने ग्रामीण व शहरी भागातील समर्थक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.