वणी येथे 20 जूनला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

अनेक नामांकित कंपनी येणार भरतीसाठी

0 1,303

बहुगुणी डेस्क, वणी: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण वणी येथे दिनांक 20 जून गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अनेक नामांकित कंपन्या येणार आहे व व्यावसायिक उत्तीर्ण विद्यार्थ्यांची भरती घेणार आहे. यात एल अँड टी, इन्फोटेक चैनई कंपनी व फंस्कूल इंडियन लिमिटेड कंपनी गोवा इत्यादी कंपनींचा सहभाग असणार आहे.

हा मेळावा इलेक्ट्रिशियन, फिटर,वेल्डर, वायरमन,प्लंबर व सुतारकाम या व्यवसायातील उत्तीर्ण प्रशिक्षणार्थीसाठी असणार आहे. तरी इच्छुक प्रशिक्षणार्थींनी शैक्षणिक कागदपत्रासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था वणी येथे उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य आर. बी बुच्चे यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.