विवेक तोटेवार, वणी: शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अवजड वाहनांचा शिरकाव वाढल्याने रस्त्याची दैना होत आहे. सोमवारी अशाच प्रकारचा एक 18 चाकी वाहन नृसिंह व्यायाम शाळेजवळून गेल्याने तिथला रस्ता पूर्ण उखडला आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना याबाबत माहिती देऊनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती.
शहरात अवजड वाहने आणण्यास बंदी असतानादेखील अनेक वाहने बेदकारपणे वणीतील रस्त्यावर धावताना दिसत आहेत. सोमवारी अशाच प्रकारचे एक अठरा चाकी वाहन क्रमांक (MH-40N-5305) दुपारी 3.15 वाजताच्या सुमारास वणीतील नृसिह व्यायाम शाळेजवळ आले. या वाहनात कृषि संबंधित साहित्य होते. सदर काही साहित्य दुकानात उतरवून वाहन मागे घेण्यास चालणे सुरवात केली. यावेळी वाहनात 30 टनाच्या जवळपास माल असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळे या वाहनाच्या चाकाने रस्ता पूर्णपणे उखडला गेला.
