अज्ञात तरुणास ट्रकने चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू

0 1,274

विवेक तोटेवार, वणी: रविवार रात्री 10 वाजताच्या सुमारास वणीतील सतिघाट रोडवर पडून असलेल्या एका अज्ञात इसमास ट्रकने चिरडले. ज्यात या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटना गणेशपूर येथील पिता व पुत्राने बघितली असून त्यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, रविवारी सायंकाळी 10 वाजता धनराज मंगल येसेकर व त्यांचा 14 वर्षाचा मुलगा हा दुचाकी वाहनाने नेरड पुरड येथे जात होते. सतिघाट येथून जात असताना त्यांना एक तरुण रस्त्यावर पडून असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या दुचाकीच्या मागे एक ट्रक होता. अचानक मागे काही फुटल्याचा भास झाला. याबाबत मुलाने धनराज यास सांगितले. धनराजने दुचाकी बाजूला उभी केली व ट्रकला पुढे जाऊ दिले. मागे जाऊन बघितले तर त्या तरुणाच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याचे समजले. तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.

धनराजने समयसूचकता दाखवीत ट्रकचा पाठलाग केला व ट्रकचा नंबर घेतला. दुसऱ्या दिवशी सोमवारी येऊन त्यांनी सदर घटना पोलिसांना सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी MH 29 553 या अज्ञात ट्रकचा चालकविरुद्ध कलम 304, 279 नुसार गुन्हा दाखल केला आहे. उत्तरीय तपासणी तरुणाचा मृतदेह वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मृतकाच्या ओळख अजूनही पटू शकली नाही. घटनेचा पुढील तपास वासुदेव नारनवरे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.