पतीनेच केला पत्नीचा खून: मूर्धोनी येथेे घडला थरार

0 2,371

विवेक तोटेवार, वणी: परराज्यातून पोटाची खळगी भरण्याकरिता आलेल्या पतीने घरगुती भांडणातून आपल्या पत्नीचा वीट व फरशीच्या तुकड्याने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी तालुक्यातील मूर्धोनी येथे घडली आहे. गावातील एका महिलेच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी पतीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.  

मध्यप्रदेशातील चोबीसा पो. स्टे. सेवापुर येथून अनेक कुटुंब मजुरीच्या कामाकरिता वणीत आले आहेत. यातीलच एक कुटुंब म्हणजे सुरज गेंदाजी भगोदी यांचं. त्याची पत्नी व मुले यांचे त्यांचं कुटुंब आहे. सोमवारी 4 मार्च रात्री 9 वाजताच्या सुमारास घरात काही शुल्लक कारणावरून सुरजची पत्नी सोनावती व सुरज यांचे जोरदार भांडण झाले. भांडणात सुरज याने त्याच्या पत्नीच्या छाती व पोटावर वीट व फरशीच्या तुकड्याने मारहाण केली.

मारहाणीनंतर सोनावती कोणतीही हालचाल करीत नसल्याने तिला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तीला मृत घोषित केले. सोनावतीच्या अंगावर कुठेही मोठी जखम नव्हती. कदाचित गुप्त मार लागला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुर्गावती यांच्या तक्रारीवरून आरोपी सुरज याच्यावर भादवी कलम 302 नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सध्या आरोपी फरार असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. घटनेचा तपास ठाणेदार वैभवकुमार  जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी अशोक काकडे करीत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.