अल्पवयीन मुलगी अत्याचार प्रकरण: ‘तो’ नराधम जेलमध्ये, तर पत्नीला अटक

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं आलं समोर, घटनेनं परिसरात संताप व्यक्त

0 594
वणी: 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी एका नराधमाच्या अत्याचारानं गर्भवती राहिली आहे. या प्रकरणानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम रंगा चिंतलवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं समोर आलं असून तो सध्या एका गुन्ह्यामध्ये जेलची हवा खात आहे. चोरीच्या गुन्ह्यामध्ये तो सध्या जेलमध्ये आहे. तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यासाठी त्याला मदत करणा-या त्याच्या पत्नीला सध्या पोलिसांनी अटक केली आहे.

 

सध्या रंगा चिंतलवार दुस-या एका गुन्ह्यामध्ये जेलमध्ये असल्यानं न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण करून वणी पोलीस त्याला अटक करणार आहे. तर या गुन्ह्यात त्याला सहकार्य करणारी त्याच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांचे मार्गदर्शनात ठाणेदार मुकूंद कुळकर्णी व सहकारी करीत आहे. नराधमाच्या अत्याचारातून एक अल्पवयीन मुलगी 8 महिन्याची गर्भवती राहिल्याचं प्रकरण वणीत घडल्यानं एकच संंताप व्यक्त केला जातोय.

काय आहे हे प्रकरण ?

मुकूटबन येथील गोडावून जवळ पीडित तरुणी वास्तव्यास आहे. तिचं कुटुंब मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती सध्या ह्यात नाही. 13 वर्षीय मुलीचे आईवडील मरण पावल्यानं ती सध्या तिच्या मोठ्या बहीणीकडे वणीला आली होती. मोठी बहीण शहरातील सार्वजनिक दुरभाष केंद्र कार्यालयाजवळ राहते. तिथेच रंगा शंकर चिंतलवार व शारदा रंगा चिंतलवार हे जोडपे राहतात. हे सर्व भंगार वस्तू गोळा करण्याचं काम करतात.

एक दिवस पीडितेवर रंगाचा डोळा गेला. त्यानं या सोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. बालिकेनं त्याला नकार देताच शारदानं तिला मारहाण करून बळजबरीने नवरा जसं करेल तसं करत जा, असं धमकावलं. त्यानंतर नेहमी धमकावून पीडितेचं या नराधमानं तिचं शोषण केलं. अशी तक्रार आजीनं केलीये.

परिणामी पीडिता गरोदर राहीली. गरोदर झाल्यानंतर शारदा रंगा चिंतलवार हीने रंगाला विरोध केला, पण वासनेत पागल झालेल्या रंगानं तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता मुकाट्याने हा अत्याचार सहन करत होती.

(पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात)

दरम्यान पीडितेची आजी वणीला आली. तिला तिच्या नातीचं पोट मोठं दिसलं. तिनं याबाबत तिला विचारणा केल्यावर तिनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सध्या ती आठ महिण्यांची गरोदर आहे. हा सर्व प्रकार रंगा शंकर चिंतलवार आणि शारदा रंगा चिंतलवार यांनी संगणमताने व बळजबरीने केला असल्याचं नातीनं आजीला सांगताच आजीनं पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार पोलीसात नोंदविली आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.